Anuradha Vipat
करीनाने 'रेफ्युजी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये अभिनेता अभिषेक बच्चनने तिच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती.
या दोघांचा हा पहिलाच चित्रपट होता. 'रेफ्युजी'मध्ये करीना आणि अभिषेकची लव्ह-स्टोरी दाखवण्यात आली.
मात्र करीनाने शूटिंगदरम्यान अभिषेकसोबत रोमँटिक सीन करण्यास थेट नकार दिला होता.
करीनाने सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे . एका शोमध्ये सिमीने अभिषेक बच्चनला व्हिडीओ कॉल केला होता.
तेव्हा अभिषेकने तिला सांगितलं की तो त्याच्या पहिल्या चित्रपटातील रोमँटिक सीन कधीच विसरू शकत नाही. कारण करीनाने तो सीनच करण्यास नकार दिला होता.
करीना आणि अभिषेक यांचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता