Anuradha Vipat
अभिनेत्री करीना कपूरने खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
करीना कपूर – सैफ अली खान यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली आहेत.
आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत करीनाने खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
मुलाखतीत करीना कपूर म्हणाली, सैफशी लग्न केल्यामुळे मी पूर्वीपेक्षा अधिक जबाबदार आणि डाऊन टू अर्थ झाली आहे.
पुढे आम्ही एकमेकांमध्ये असलेल्या कमतरता पूर्ण करतो. मी त्रासलेली असेल तर, सैफ मला समजवतो. तर सैफ कधी त्रासलेला असेल तर मी त्याची समज काढते असं करीना कपूर म्हणाली आहे
पुढे करिना म्हणाली, अनेकदा असं होतं एकाच घरात राहून देखील आम्ही एकमेकांना भेटत नाही. कारण कामामुळे आमची शिफ्ट वेगळी असते.
व्यस्तवेळापत्रकामुळे काम आणि नात्यांवर प्रभाव पडतो. त्यामुळे वाद देखील होतात असंही करिना पुढे म्हणाली