Anuradha Vipat
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर या दोन बहिणींना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
करीना कायम तिच्या खासगी आयुष्यात घडलेल्या घटना चाहत्यांसोबत शेअर करत असते.
एका मुलाखतीत करीनाने बहीण करिश्माबद्दल मोठं सत्य सांगितलं आहे.
करिश्माच्या आयुष्यात जेव्हा वाईट काळ सुरु होता. तेव्हा करीनाने तिला जवळून पाहिलं आहे.
करिश्माबद्दल करीना म्हणाली, ‘मी करिश्माला तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून पाहात आहे. मी करिश्माला रात्रभर आईसोबत एका खोलीत रडताना पाहिलं आहे.
करिश्माला बॉलिवूडमध्ये यश तर मिळालं, पण खासगी आयुष्यात करिश्माने अनेक अडचणींचा सामना केला आहे