सकाळ डिजिटल टीम
कारल्याचा रस (ज्यूस) आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, प्रत्येकजण कारलं पाहिल्यानंतर नाक-तोंड मुरडत असतात.
मात्र, कारल्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते.
याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात, म्हणूनच आयुर्वेदात कारल्याचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.
कारल्याचे सेवन मधुमेह, दमा, खोकला, संधिवात आणि त्वचेच्या आजारांपासून अनेक प्रकारे आराम देतो.
अनेक गुणांनी युक्त कारल्याचा रस आठवड्यातून एकदाच प्यायला हवा, त्यापेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त.
कारल्याचा रस प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते.
तजेलदार त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही कारल्याचा रस देखील घेऊ शकता.
मधुमेही रुग्णांनाही कारल्याचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.