Anuradha Vipat
'आपका अपना झाकीर' या कार्यक्रमात करिश्माने हजेरी लावली होती.
झाकीरने करिश्माला “कपूर घराण्यातील महिलांवर काम करण्याबाबत काही बंधनं होती का असा सवाल केला होता.
त्यावर करिश्माने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.
करिश्मा म्हणाली की, जेव्हा माझ्या आईचं लग्न झालं नीता काकींचं लग्न झाल तेव्हा त्यांनी हा पर्याय निवडला की त्यांना घराकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे.
पुढे करिश्मा म्हणाली की, शम्मी काका आणि शशी काकांच्या पत्नी गीता बालीजी आणि जेनिफर काकी यांनी लग्नानंतरही काम केलं आहे
पुढे करिश्मा म्हणाली की, त्यामुळे कपूर घराण्यात लग्नानंतर महिलांना काम करण्याची परवानगी नाही या चर्चा खोट्या आहेत.
करिश्मा कपूरने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली