Wildlife Safari: ह्या पावसाळ्यात अनुभवा कर्नाटकातील वाइल्डलाईफ सफारी

Swapnil Kakad

नागरहोल नॅशनल पार्क

हे नॅशनल पार्क देखील वर्षभर खुले राहते. पण पावसाळ्यात ह्या भागात अतिवृष्टी होते त्यामुळे भेट देण्याआधी येथील अधिकाऱ्यांकडे सफारी बाबत नक्की चौकशी करा.

karnataka jungle safari | esakal

बन्नेरघट्टा नॅशनल पार्क

बेंगळुरूजवळील हे नॅशनल पार्क म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची एक सुंदर (आणि जलद) संधी! येथे तुम्हाला जंगल सफारी, प्राणीसंग्रहालय, आणि बटरफ्लाय पार्क पाहता येईल.  

Bannerghatta National Park | esakal

दांडेली अभयारण्य

दांडेलीमध्ये तुम्हाला जंगल सफारी आणि पक्षिनिरीक्षणासोबतच काली नदीवर व्हाईट वॉटर रिव्हरराफ्टिंगचा अडव्हेंचर्स अनुभव घेता येतो.

Dandeli Wildlife Sanctuary | esakal

भद्रा वन्यजीव अभयारण्य

चिकमंगळूरमधील हे अभयारण्य वाघ, बिबट्या, रानगवा, आणि अनेक पक्षांचे घर आहे. येथील जंगल सफारीमध्ये तुम्हाला हे वन्यजीव जवळून पाहता येतील.

Bhadra Wildlife Sanctuary | esakal

पुष्पगिरी अभयारण्य

कूर्गमधील हे अभयारण्य येथील पक्षांच्या विशिष्ट प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. ह्या अभयारण्यात पक्षांच्या २०० प्रजाती आढळतात.

Pushpagiri Wildlife Sanctuary | esakal

कुद्रेमुख नॅशनल पार्क

ह्या नॅशनल पार्कचा अनोखा प्रदेश, येथील टेकड्या, आणि गवताळ प्रदेशात अनेक प्रकारचे वन्यजीव आढळतात.

Kudremukh National Park | esakal

अराबिथिट्टू वन्यजीव अभयारण्य

म्हैसूरजवळील हे अभयारण्य म्हणजे पक्षिनिरीक्षकांसाठी स्वर्गच! येथे पाणकोली आणि चित्रबलाकसारखे अनेक स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांच्या प्रजाती राहतात.

Arabithittu Wildlife Sanctuary Karnataka | esakal

गैलीबोर नेचर कॅम्प

कावेरी नदीच्या काठावर वसलेल्या ह्या कॅम्पमध्ये तुम्ही कोरॅकल रायडींग, फिशिंग, कॅम्पिंग आणि बर्डवॉचिंगचा अनुभव घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Galibore Nature Camp | esakal