Vrushal Karmarkar
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या लोकप्रिय हॉरर-कॉमेडी चित्रपट भूल भुलैया 3 साठी चर्चेत आहे. या चित्रपटात कार्तिकने साकारलेली रूह बाबाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडते.
या चित्रपटापूर्वी कार्तिकने भूल भुलैया ३ मध्ये रुह बाबा ही भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकली होती. नुकतेच एका मुलाखतीत कार्तिकने त्याच्या पहिल्या कारबद्दल अनेक खुलासे केले आहेत, जे ऐकून कोणीही थक्क होईल.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने स्वत:साठी खरेदी केलेल्या पहिल्या कारची कथा शेअर केली. रूह बाबाने त्याच्या "थर्ड-हँड" कारबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या, ज्याची किंमत त्याला सुमारे 50,000 रुपये होती.
त्याने सांगितले की कारमध्ये चांगली म्युझिक सिस्टीम होती. त्याला त्यात लाँग ड्राईव्ह करायला आवडायचे. पण पावसाळ्यात ती गळू लागायची. त्यामुळे डोक्यावर पाणी पडायचे.
नंतर ती दुरुस्त करणे शक्य नसल्याने त्याला ते द्यावी लागली. तो त्याच्यासाठी खूप भावनिक क्षण होता. त्यानं सांगितलं की, ती टोयोटा कोरोला होती. पण "अत्यंत खराब स्थितीत" होती.
मात्र, आता कार्तिककडे अनेक महागड्या आणि आलिशान कार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आता लॅम्बोर्गिनी, रेंज रोव्हर, मॅकलरेन आणि मिनी कूपरचा मालक आहे.
कार्तिक आर्यन तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षितसोबत भूल भुलैया 3 मध्ये दिसत आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे.
सिंघम अगेनमधून अंबानी बंधू करणार कमाई