सकाळ डिजिटल टीम
कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.
यावेळी मानाचा वारकरी म्हणून उदगीर येथील विठ्ठल भक्त बाबासाहेब सगर यांना महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला.
कार्तिक यात्रेनिमित्ताने (Kartiki Yatra) मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
काल पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेनंतर दर्शन सुरू करण्यात आले.
यात्रेनिमित्ताने पंढरीत भक्तीचा सागर उसळला आहे. सुमारे तीन ते चार लाख भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
विठ्ठल-रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे. गोपाळपूर रोडवरील दहा पत्राशेड भाविकांनी भरले आहेत.
विठ्ठल-रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग तीन किलोमीटर अंतरावर गेली आहे. दर्शनासाठी सहा ते सात तासांचा वेळ लागत आहे.
दर्शन रांगेतील भाविकांसाठी मंदिर समितीकडून विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.