हे 5 हेल्दी पदार्थ खाऊन सोडा करवा चौथचा उपवास

साक्षी राऊत

करवा चौथ उपवास

करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी बहुतांश महिला तळलेले पदार्थ खातात. पूर्ण दिवस उपाशी राहिल्यानंतर या गोष्टी खाल्ल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते. तेव्हा उपवास सोडण्यासाठी या गोष्टी खाव्यात.

Karva Chauth

फ्रुट ज्यूस

करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी पाणी प्यायल्यानंतर फ्रूट ज्यूस प्या. ज्यामुळे तुमची बॉडी हायड्रेट राहील. याशिवाय उपवास सोडल्यानंतर चहा पिऊ नये. असे केल्याने पोटात गॅसेसच्या समस्या होतात.

Karva Chauth

सूप

उपवास सोडताना सूप प्या. सूपमध्ये ९० टक्के पाणी असते. जे शरीराला एनर्जी देते. तुम्ही टोमॅटो किंवा मिक्स व्हेजिटेबलचे सूप पिऊ शकता.

Karva Chauth

ड्राय फ्रूट्स

करवा चौथच्या दिवशी घरी छोले, पूरी यांसारखे पारंपारिक पदार्थ बनवले जातात. जे खायला चविष्ट असतात. मात्र त्यात असणारे मसाले डायटेस्टिव्ह सिस्टिम खराब करू शकतात. त्याऐवजी तुम्ही ड्राय फ्रूट्स, बदाम यांसारखे पदार्थ खाऊ शकतात.

Karva Chauth

मूगाचा शिरा

उपवास सोडण्यासाठी मूगाचा शिरा ट्राय करा. यात भरपूर प्रमाणात आयर्न, फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम असते. जे पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करते.

Karva Chauth

इडली

करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी इडली सांभरसुद्धा तुम्ही खाऊ शकता. दिवसभर उपाशी राहिल्यानंतर इडली खाल्ल्याने शरीराला पोषण मिळते. पचायला ती हलकी असते.

Karva Chauth

अशाप्रकारे हेल्दी पदार्थ खाऊन तुम्ही करवा चौथचा उपवास सोडू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karva Chauth