Aishwarya Musale
सुवासिनी महिला करवा चौथला पतीला दिर्घायुष्य मिळावे यासाठी व्रत ठेवतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात. बहुतेक स्त्रिया या दिवशी साडी, बॅंगल्स, ज्वेलरी घालण्यासाठी तयारी केल्याही असतील.
तुम्हाला हेअरस्टाईल, मेकअपपासून ते कॉम्पलिमेंटपर्यंत तुमच्या लुकला परफेक्ट लूक मिळावा यासाठी जेणेकरून तुम्ही हा करवा चौथला सर्वात खास आणि आकर्षक दिसाल.
करवा चौथला बहुतेक स्त्रिया एथनिक कपडे घालतात. पारंपारिक कपड्यांसह हेअरस्टाइल योग्य नसल्यास लूक अपूर्ण दिसतो. करवा चौथदिवशी केसांना गजरा लावल्याशिवाय हा दिवस पूर्ण होणार नाही.
एथनिक लूक गजराशिवाय पूर्ण होणार नाही. गजरा हा नेहमीच महिलांचा आवडता राहिला आहे. जर तुम्हाला या करवा चौथला आपल्या केसांमध्ये गजरा लावायचा असेल तर आम्ही येथे काही गजरांच्या स्टाइल्सबद्दल सांगणार आहोत.
आजकाल मुली आपल्या केसांमध्ये कानाच्या मागे दोन फुले सजवून ट्रेंडी लुक घेतात. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गुलाबाची फुले लावू शकता. यासाठी मीडियम हाय बन बनवा.
सिंपल गजरा तुम्हाला डिफरेंट लूक देतो. हे करण्यासाठी, अर्धे केस मोकळे सोडा आणि बाकी केसांना बांधून ठेवा. नंतर त्यात पातळ गजरा टाका.
तुम्ही खुल्या केसांमध्ये मल्टी लेयर गजरा बनवू शकता. यासाठी केस मधून वेगळे करा आणि दोन्ही बाजूंनी पफ बनवा. मग क्राउन हेडवर एक पफ बनवा आणि केस हाफ पिनअप करा. पफच्या खालच्या बाजूपासून, तुम्ही दोन गजरांचे लेयर पिनअप करा.
जाल वर्क गजरा ही गजरा स्टाइलची लेहेंगा किंवा साडी कोणत्याही पारंपारिक आउटफिटवर सुंदर दिसेल. ते बनवणेही सोपे आहे. बाजारात तुम्हाला जाल वर्क गजरा मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.