सकाळ ऑनलाईन
आपल्या दिलखेच अदा अन् नृत्यानं सर्वांना वेड लावणारी गौतमी पाटील एव्हाना सर्वांना माहितीच आहे.
आज दहीहंडी निमित्त मुंबईत विविध मंडळांच्या स्टेजवर गौतमीसह इतरही अनेक डान्सर्सनी उपस्थितांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडलं.
पण या गर्दीत एक डान्सर अशी होती जिने तरुणाईला वेड करुन टाकलं, ही डान्सर म्हणजे राधा पाटील मुंबईकर.
आत्तापर्यंत गौतमीचाच सगळीकडं जलवा होता, सबसे कातिल गौतमी पाटीलशिवाय सार्वजनिक कार्यक्रमांना पर्यायच नव्हता.
पण आता 'कातिलों की कातिल, राधा पाटील' अवतरली आहे. यंदाच्या दहीहंडीत तिचा मोठा बोलबाला पहायाला मिळाला.
राधा पाटील ही आपलं नाव राधा मुंबईकर असं लावते. मूळ मुंबईकर असल्यानं तीनं हे नाव धारण केलं आहे.
राधा पाटील मुंबईकर हीचा जन्मच मुंबईचा आहे. राधा मुंबईकर या नावानं तिचं सोशल मीडिया हँडलही चालवलं जातं.
यापूर्वी राधा मुंबईकर हीनं गौतमी पाटीलवर टीकाही केली होती. कलेशी प्रामाणिक रहायला हवं, शेवटी कोणी कसा डान्स करायचा हे ज्यानं त्यानं ठरवायचं असं तीनं म्हटलं होतं.
मला दुसऱ्यांच्या आडनावांचं माहिती नाही पण मी खानदानी पाटील आहे, याचे पुरावेही मी देऊ शकते असं तिनं म्हटलं होतं.
राधा पाटील मुंबईकर इन्स्टावर अॅक्टिव्ह असून तिचे डान्स व्यतिरिक्त वेगवेगळ्या रुपातलं तिचं दर्शन होतं.
दहीहंडी निमित्त सध्या गौतमी पाटील काय अन् राधा पाटील काय? सर्वांना जोरदार सुपाऱ्या मिळाल्या आहेत.
कलाप्रेमी महाराष्ट्रात आता या प्रकारच्या रेकॉर्ड डान्सचा ट्रेन्ड सुरु झाला आहे. सहाजिकच गौतमी पाटीलनं हा ट्रेन्ड सुरु केला आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून गौतमी पाटील हीनं महाराष्ट्रात सार्वजनिक कार्यक्रमांचं मार्केट जाम केलं आहे.
लहान-थोरांपासून कोणाला गौतमी पाटील माहिती नाही, असं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे.
तरुणाईचा मनोरंजनाचा बदलत्या ट्रेन्डवर आता गौतमी पाटील, राधा पाटील या अधिराज्य गाजवत आहेत. हे मात्र नक्की.