कतरीना कैफ ते आलिया भट्ट ; बॉलिवूडमधील 'हे' कलाकार कधीच मतदान करत नाहीत, जाणून घ्या कारण

kimaya narayan

कतरीना कैफ

विकी कौशलची पत्नी आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरीना कैफ ही इंग्लडची नागरिक आहे. त्यामुळे ती कधीच मतदान करत नाहीत. भारतात येऊन इतकी वर्ष झाली तरीही तिने नागरिकत्व स्वीकारलेलं नाहीये.

जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिन फर्नांडिस ही अभिनेत्री श्रीलंकेची नागरिक आहे. त्यामुळे ती मतदान करत नाहीत.

इम्रान खान

आमिर खानचा भाचा इम्रान खान हा अमेरिकेचा नागरिक आहे. त्याने अजूनही भारतीय नागरिकत्व स्वीकारलेलं नाही. म्हणून तो मतदान करू शकत नाहीत.

नोरा फतेही

अभिनेत्री नोरा फतेही ही डान्सर म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. नोरा ही कॅनेडियन-मोरोक्कन नागरिक आहे.

सनी लियोनी

अभिनेत्री सनी लियोनी ही कॅनेडियन नागरिक आहे. तिने अजूनही भारतीय नागरिकत्व स्वीकारलं नाहीये.

इलियाना डिक्रुझ

अभिनेत्री इलियाना डिक्रुझकडे पोर्तुगीज सिटीझनशिप आहे. ती सध्या परदेशात राहते. त्यामुळे ती मतदान करू शकत नाही.

कल्की कोचलीन

कल्कीचा जन्म भारतात झाला असला तरीही ती भारतीय नागरिक नाहीये. तिचे आई-वडील फ्रेंच असल्यामुळे तिच्याकडेही फ्रेंच नागरिकत्व आहे.

आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्टचे आई-वडील हे भारतीय नागरिक आहेत पण आलियाचा जन्म इंग्लडमध्येही झाला आहे. त्यामुळे आलियाकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे.

आलियाचे क्युट मुमेंट्स - येथे क्लिक करा