पुजा बोनकिले
अनेक लोक मित्रांव्यतिरिक्त कारने कुटूंबासह प्रवास करतात.
पण एक लहानशा निष्काळजीपणाचे रूपांतर मोठ्या अपघातात कधी होईल हे सांगता येत नाही.
तुम्ही मोठ्यांसोबत सहज गाडी चालवू शकता, कारण ते गाडीत बसून स्वतःची काळजी घेऊ शकतात.
पण जर लहान मुले कारमध्ये असेल तर गाडी चालवताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
लहान मुलेही सोबत असतील तर कार चालवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.
कारमध्ये लहान मुल असतील तर सीट बेल्ट बाधांवे.यामुळे कोणतीही दुर्घटना होणार नाही.
अनेक कारमध्ये चाइल्ड लॉकची सोय असते. यामुळे लहान मुले कारचे दार उघडू शकत नाही.
कारमध्ये स्पेशल चाइल्ड सीटचा वापर करावा.
लहान मुले प्रवासादरम्यान सोबत असेल तर सनरूफ किंवा कारच्या खिडक्या उघड्या ठेऊ नका.