Monika Lonkar –Kumbhar
उन्हाळ्यात लहान मुलांच्या परीक्षा संपतात अन् त्यांना सुट्ट्या लागतात.
या सुट्ट्यांमध्ये मग विविध प्लॅन्स बनवले जातात. काही जण कुटुंबासोबत फिरायला जातात तर काही जण मुलांसाठी वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटी करण्यावर भर देतात.
उन्हाळ्यात आणखी एक गोष्ट आवर्जून केली जाते. ती म्हणजे पोहायला जाणे होय. याच दिवसांमध्ये काही पालक आपल्या मुलांना स्विमिंग शिकवतात
मुलांना पाण्यात पोहायला शिकवण्यापूर्वी एकदा त्यांची आरोग्य तपासणी अवश्य करून घ्या.
लहान मुलांना स्विमिंगला पाठवण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्यासाठी फायदेशीर अन् महत्वाचे असणारे स्विमिंग कीट अवश्य खरेदी करा.
जर तुमचा मुलगा किंवा मुलगी वयाने लहान आहे. जसे की, त्यांचे वय ५ वर्षाच्या आतील आहे, तर अशा मुलांसाठी स्विमिंग ट्यूब अवश्य खरेदी करा.
मुलांना पोहण्याच्या क्लासला लावण्यापूर्वी, जलतरण तलावाची स्वच्छता केलेली आहे का? हे नक्की चेक करा.