कार्तिक पुजारी
वायनाड भूस्खलन पीडितांसाठी अल्लू अर्जुन धावून आला आहे
केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झाले आहे. यामध्ये आतापर्यंत २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे
वाडनाडमधील पीडितांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला
पुष्पा फेम साऊथ फिल्म इंडस्ट्रिचा स्टार अल्लू अर्जुनने देखील वायनाड पीडितांसाठी मदत जाहीर केलीये
लोकांच्या पुनर्वसनासाठी अल्लू अर्जुनने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाखांची मदत केली आहे
अल्लू अर्जून याने सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली आहे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये १०० घरे बांधणार असल्याचं घोषित केलं आहे