आशुतोष मसगौंडे
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने मंगळवारी धरणाच्या सांडव्यावर तिरंग्याच्या रंगातील नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई केली आहे.
येथे १४ ऑगस्ट रोजी रात्री देशभक्तीपर विषयावरील लेझर शो आयोजित करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी साडेसहा ते पावणेदहा वाजेपर्यंत हा लेझर शो आयोजित करण्यात आला आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मागील वर्षी पासून धरणाच्या सांडव्यावर विद्युत रोषणाई केली जात आहे.
यंदाही स्थिर रोषणाईसह आकाशात धवल रंगाचे प्रकाशझोत टाकण्यात आलेले आहे. केशरी, पांढऱ्या व हिरव्या रंगातील फुग्यांच्या कमानी करण्यात आल्या आहेत.
पानशेत व वरसगाव धरणांच्या सांडव्यावरही अशीच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
विद्युत रोषणाई करण्यात आली असली तरी धरणाच्या सांडव्यातून नदीमध्ये कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून खडकवासला धरण साखळी परिसरात मुसळधार पाऊस होत असल्याने जवळपास सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.