कार्तिक पुजारी
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तेलुगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत
कधी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ७४ वर्षी चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला १६ जागा मिळाल्या आहेत.
चंद्राबाबू नायडू यांनी १९७० मध्ये वयाच्या २८ व्या वर्षी काँग्रेसमधून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली
१९७८ मध्ये ते आंध्र प्रदेश विधानसभेमध्ये चंद्रगिरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले, ते १९८० ते १९८३ या काळात मंत्री देखील होते
१९८३ मध्ये टीडीपीची सत्ता आल्यानंतर त्यांनी टीडीपीमध्ये प्रवेश केला. त्यांचे सासरे एनटी रामा राव यांनी या पक्षाची स्थापना केली होती
टीडीपीमध्ये राहून त्यांनी महत्त्वाचं काम केलं,पण १९९५ मध्ये त्यांनी पक्षात आपला गट तयार केला
अनेक आमदार त्यांच्यासोबत होते, त्यामुळे ते आंध्राचे मुख्यमंत्री झाले. २०२३ मध्ये एका प्रकरणात त्यांना तुरुगंवास झाला होता.