Anuradha Vipat
अभिनेते किरण माने यांनी बिग बॉस मराठीबद्दल भाष्य केलं आहे.
फेसबुक पोस्ट शेअर करत त्यांनी तीन स्पर्धकांना आपला पाठिंबा दिला आहे.
धनंजय पोवार, सूरज चव्हाण आणि घन: श्याम दराडे या तिघांना किरण माने यांनी पाठिंबा दिला आहे.
पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, हे कसेही खेळले, समजा मुर्खपणा केला, तरी माझं प्रेम आणि सपोर्ट या तिघांना रहाणार. तिघं गावच्या मातीतली आहेत
पुढे किरण मानेंनी म्हटलं आहे की, दुसरं म्हणजे शहरी ‘सो काॅल्ड’ सभ्य-असभ्यता, संस्कृती-फिंस्कृती, शुद्ध-अशुद्धता उंच कोलून, रिअल वागून लोकप्रिय होऊन इथवर पोहोचलेली आहेत. इथेही ते जे काहीही कसेही वागतील ते ‘रिअल’ असणार.
पुढे किरण मानेंनी म्हटलं आहे की, तर डीपी, घन:श्याम आणि सूरज तुम्ही तुमच्या श्टाईलनं धुमडी उडवा त्या घरात. पुंग्या टाईट करा एकेकाच्या. तुम्हा तिघांनाबी लै लै लै प्रेम, लब्यू
किरण माने सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असतात