Anuradha Vipat
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी आणि दिग्दर्शक किरण राव सध्या तिच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
त्याबरोबरच किरणने केलेल्या आणखी एका वक्तव्यामुळेही ती चर्चेत होती
किरण रावने संदीप रेड्डी वांगा याचा कबीर सिंग तसेच बाहुबली यासारख्या चित्रपटांना महिलाविरोधी म्हटलं होतं.
त्यावर संदीप रेड्डीने किरण रावला जाऊन दिल चित्रपट पहावा, ज्यामध्ये आमिर खान त्यातील नायिकेला बलात्काराची धमकी देतो, असे म्हटले होते.
त्यावर आता किरणनेही प्रत्युत्तर दिले असून आमिरच्या कामाबद्दल त्याच्याशीच बोलावं असं तिने सांगितलं आहे.
किरण राव सध्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून त्याची बरीच चर्चा सुरू आहे