'अश्विनी ये ना' पेक्षा माझं गाणं सुपरहिट ; सचिन पिळगावकरांनी चक्क किशोरदांपुढे वाजवला होता डंका

kimaya narayan

किशोरकुमार

बॉलिवूडमधील सगळ्यात ज्येष्ठ पण उत्तम गायक म्हणजे किशोरकुमार. उत्तम अभिनेते म्हणूनही त्यांची ख्याती होती.

मराठी इंडस्ट्रीत पदार्पण

गंमत जंमत या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच मराठी इंडस्ट्रीत पार्श्वगायन केलं. सचिन पिळगावकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती.

सचिन पिळगावकर

सचिन यांनी खूप विनंती केल्यामुळे किशोर कुमार या सिनेमात गाणं गाण्यासाठी तयार झाले. या सिनेमातील दोन गाणी गाजली.

दोन गाणी हिट

एक गाणं म्हणजे चोरीचा मामला आणि दुसरं अश्विनी ये ना. सचिन यांनी स्वतःच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे.

किशोरकुमार यांनी विचारला जाब

'अश्विनी ये ना' हे गाणं किशोर कुमार यांनी गायलं होतं. जेव्हा त्यांच्या कानावर चोरीचा मामला हे गाणं त्यांच्या गाण्यापेक्षा हिट झाल्याचं गेलं तेव्हा त्यांनी सचिन यांना जाब विचारला. तेव्हा समजावणीच्या सुरात सचिन म्हणाले कि तुमचं गाणं जास्त लक्षात राहील.

कलाकारांचं मोठेपण

किशोरदांना हे बोलणं खटकलं असलं तरीही त्यांनी ते मनावर न घेता सचिन यांच्यासमोर पुढील सचिन यांच्या मराठी सिनेमात अशोक सराफ यांच्यासाठी आवाज देण्याचा प्रस्ताव ठेवला आणि सचिन यांना त्यांच्याबरोबर गाण्याची विनंती केली. कलाकारांचं मोठेपण म्हणतात ते हेच!

अंकिता वालावलकरचा नवरा कोण ? - येथे क्लिक करा