2 मिनिटांत सोलून होईल किलोभर मटार; ही ट्रिक वापरुन बघाच

Aishwarya Musale

हिवाळा

हिवाळ्यात मटार मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होतो. तसंच, तो स्वस्तही असतो. त्यामुळं गृहिणी मटार आणून ठेवतात.

Peas | Sakal

ट्रिक

पण मटार आणल्यानंतर एक कष्टाचे काम असते ते म्हणजे मटार सोलणे. पण या ट्रिकमुळं अगदी 2 मिनिटांतच किलोभर मटार सोलून होईल. 

Peas | Sakal

मटार

मटार लवकर सोलण्यासाठी सगळ्यात मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते 3 ते 4 मिनिटांसाठी उकळवून घ्या. नंतर त्यात मटार टाका आणि झाकण लावून घ्या. पाच मिनिटे मटार असाच ठेवा. 

Peas | Sakal

चव खराब होणार नाही

पाच मिनिटांनंतर पाण्यातून मटार एका मोठ्या ताटात काढून घ्या. काळजी करु नका या पद्धतीने मटारची चव थोडी देखील खराब होणार नाही. 

Peas | Sakal

मटार

मटार उकळलेल्या पाण्यातून काढून घेतल्यामुळं त्याची सालं नरम होतात आणि आपोआप उघडतात. त्यामुळं हलक्या हाताने दाब दिला तरी लगेचच वाटाणे बाहेर येतात. 

Peas | Sakal

दुसरी पद्धत

दुसरी पद्धत म्हणजे मटार मोठ्या ताटात काढल्यानंतर त्यावर पाण्याच्या ग्लासने त्यावर रगडा. त्यानंतर मटार आणि साल वेगळे होतील आणि सोप्या पद्धतीने सोलले जातील.   

Peas | Sakal

ओव्हनमध्ये गरम करुन घ्या

मटार सोलण्यापूर्वी तव्यावर किंवा ओव्हनमध्ये मटार थोडेसे गरम करुन घ्या. थोडे गरम झाल्यानंतर मटार लगेचच सोलले जातील.   

Peas | Sakal

तिसरी पद्धत

तिसरी पद्धत म्हणजे मटार सोलण्यापूर्वी त्याच्या सुरूवातीचे आणि मागचे टोक सुरीने किंवा कैचीने कापा म्हणजे मधला भाग मोकळा होऊन वटाणे सोलले जातील.  

Peas | Sakal

देशात पुन्हा वाढला कोरोनाचा धोका, या आयुर्वेदिक उपायांनी करा स्वतःचा बचाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Corona | Sakal
येथे क्लिक करा