Monika Lonkar –Kumbhar
बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अन् व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
हा लठ्ठपणा दूर करण्यासाठी लोक विविध प्रकारचे उपाय करतात.
काही जण डाएट प्लॅन्सची मदत घेतात तर काही जण डाएटसोबत व्यायाम ही करतात.
बडीशेपच्या बियांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही बडीशेपचे पाणी पिऊ शकता.
आलं आणि हळदीचे पाणी प्यायल्याने शरीराची चरबी कमी होऊ शकते.
चिमूटभर हळद आणि मध मिसळून रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
काळी मिरी, हळद आणि मध मिसळून पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकते. काळी मिरीमध्ये असलेल्या पोषकतत्वांमुळे वजन नियंत्रित राहू शकते.