धनश्री भावसार-बगाडे
आपल्या पैकी सगळ्यांनीच ब्रेड खाल्लेला आहे यात शंका नाही.
पण त्या पूर्ण पाकीटामधल्या ब्रेडची पहिली आणि शेवटची स्लाइस वेगळी का दिसते?
त्या स्लाइसचा विचित्र आकार आणि जाडी यामुळे बरेच लोक ते खाण्याऐवजी टाकून देतात.
ब्रेड एका पॅनमध्ये बनवला जातो. त्याचा एक साचा असतो.
ब्रेड शेकला गेल्यावर त्याची बाहेरची सर्व बाजू कडक होते.
स्लाइस करताना त्या कडक शेकल्याने पहिली आणि शेवटची स्लाइस जाड आणि साच्याच्या आकारात येते, बाकीच्या पातळ स्लाइस असतात.
ब्रेडच्या सर्वात वरच्या आणि खालच्या भागात कडक स्लाइस असल्याने त्या आतल्या मऊ स्लाइस ब्रेडचं रक्षण करतात.
बरेच लोक या कडक स्लाइस खात नाही. फेकून देतात. पण असं करणं योग्य नाही.
या कडक स्लाइसेसमध्ये सर्वाधिक फायबर असते. जे तुम्हाला उपयुक्त ठरते. म्हणून या स्लाइस खायला हव्यात.
ब्रेड बटर, सँडविचला जरी या स्लाइस खाल्ल्या नाहीत तरी यापासून वेगळ्या डिशेस बनवून त्या मुलांना खायला द्याव्यात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.