रोहित कणसे
टीम इंडिया विरूद्ध साउथ आफ्रिका यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात भारताचा फलंदाज के एल राहुल पुन्हा एकदा चमकला आहे.
केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत कठीण काळात शानदार शतक झळकावून इतिहास रचला असूनत्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या.
सेंच्युरियन ग्राउंडवर एकाहून अधिक शतके करणारा केएल राहुल हा पहिला विदेशी फलंदाज ठरला आहे.
यापूर्वी 2021-22 मध्ये केएल राहुलने 260 चेंडूत 123 धावांचे शतक येथेच झळकावले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्याच मैदानावरील हे त्याचे दुसरे कसोटी शतक आहे.
केएल राहुलने टीम इंडियासाठी सर्वकाही केलं आहे, वनडेत सलामी, मधल्या फळीत फलंदाजी अन् विकेट कीपिंग देखील त्याने केली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सलामी फलंदाज, मध्यक्रम आन् विकेटकीपिंग देखील तसेच T20I मध्ये सलामी अन् विकेट कीपिंग अशा सर्व भूमिकेत केएलने स्वतःला सिद्ध केलं आहे.
त्याचे पहिले शतक 2021 मध्ये आले, जेव्हा त्याने सलामीवीर म्हणून शानदार 123 धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आणि इंग्लंड या देशांमध्ये कसोटी शतक ठोकणारा ऋषभ पंतनंतर 31 वर्षीय हा दुसरा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.
कुस्तीपटू राहुल गांधी! बजरंग पुनियासोबत उतरले 'आखाड्यात'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.