Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने 27 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला.
असे असले तरी या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने अर्धशतकी खेळी करत एक मोठ्या वैयक्तिक विक्रमाला गवसणी घातली.
त्याने सलामीला खेळताना 48 चेंडूत 76 धावांची खेळी केली. यासह त्याने आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून 4000 धावा पूर्ण केल्या.
त्याने सलामीवीर म्हणून 94 व्या डावातच 4000 आयपीएल धावा पूर्ण केल्या. त्यामुळे तो सलामीला खेळताना सर्वात कमी डावात 4000 धावा करणारा खेळाडू ठरला.
याशिवाय केएल राहुल 4000 धावा करणारा पाचवाच सलामीवीर ठरला आहे.
आयपीएलमध्ये 27 एप्रिलपर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत अव्वल क्रमांकावर शिखर धवन असून त्याने 202 डावात 6362 धावा केल्या आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर असून त्याने 162 डावात 5909 धावा सलामीला खेळताना केल्या आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ख्रिस गेलने आयपीएलमध्ये सलामीला खेळताना 122 डावात 4480 धावा केल्या आहेत.
चौथ्या क्रमांकावर विराट असून त्याने 107 डावात सलामीला फलंदाजी करताना 4041 धावा केल्या आहेत.