Pranali Kodre
आयपीएल 2024 मधील 34 वा सामना केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे.
या सामन्यापूर्वी केएल राहुलने चेन्नईचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीबरोबरच्या खास क्षणाचा स्टार स्पोर्ट्सशी बोलताना खुलासा केला आहे.
केएल राहुलने सांगितले की त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कसोटी, वनडे आणि टी20 पदार्पणाची कॅप एमएस धोनीच्या हातून मिळाली आहे, तेच धोनीबरोबरचे क्षण त्याच्यासाठी सर्वात खास आहेत.
तसेच त्याने सांगितले की धोनीबरोबर खेळणे आणि जिंकणे व पराभव पाहाणे या गोष्टी खास आहेतच, पण पदार्पणाची कॅप मिळणे हेच त्याच्यासाठी सर्वात खास आहे.
याशिवाय त्याने असंही सांगितलं की फक्त त्याच्यासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठीच विशेष व्यक्ती आहे.
केएल राहुलने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिन्ही क्रिकेट प्रकारात एमएस धोनीच्या नेतृत्वात पदार्पण केले होते.
केएल राहुलने डिसेंबर 2014 मध्ये कसोटी पदार्पण केले, त्यानंतर जून 2016 मध्ये वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
विशेष म्हणजे केएल राहुलने कसोटी पदार्पण 2014 साली डिसेंबरच्या अखेरीस मेलबर्नला झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीतून केले, हाच सामना धोनीचा कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना होता. या सामन्यानंतर धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतली होती.