Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कोणता खेळाडू कोणत्या संघात जाऊ शकतो, यावर गेल्या अनेक दिवसांपासून विविध रिपोर्ट्सही समोर येत आहेत.
केएल राहुल बाबतही सध्या चर्चा आहे की तो पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात जाऊ शकतो.
तो गेल्या दोन वर्षापासून लखनौ सुपर जायंट्स संघाकडून नेतृत्व करत आहे. पण आता त्याला लखनौ संघ करारमुक्त करण्याची शक्यता आहे.
अशातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात चाहत्यानेही याबाबत केएल राहुलला प्रश्न विचारला. त्यावर केएल राहुलने 'बघू, आशा आहे.' असं उत्तर दिलं.
केएल राहुलचं हे उत्तर ऐकून आता तो बेंगळुरू संघात येऊ शकतो, या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
केएल राहुलने आयपीएल २०१३ मध्ये बंगळुरूकडून पदार्पण केले होते. तो २०१८ आयपीएलपूर्वी या संघातून बाहेर झाला होता.