ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)
भारतीय लष्करामध्ये बढती मिळून फिल्ड मार्शल झालेले सॅम माणेकशॉ पहिले अधिकारी ठरले.
३ एप्रिल १९१४ साली सॅम माणेकशॉ यांचा जन्म अमृतसरमधील एका पारशी कुंटुंबामध्ये झाला.
त्यांचे पूर्ण नाव सॅम होर्मुसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ असे आहे.
सॅम माणेकशॉ यांनी ४० वर्षे भारतीय लष्करात कार्य केले व ५ मोठ्या लढाया लढल्या.
बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलने "सॅम बहादूर" या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारली.
भारतीय लष्कर युद्धासाठी तयार आहे का या प्रश्नाला त्यांनी ‘मी कायमच तयार असतो स्वीटी’असे उत्तर दिले होते.
१९४२ साली जपानविरुद्ध बर्मा येथे झालेल्या लढाईमध्ये त्यांना ९ गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
सॅम माणेकशॉ यांना १९४२ साली मिलेट्री क्रॉस पुरस्कार, १९६८ साली पद्मभूषण आणि १९७२ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
१९७२ साली राष्ट्रपतींच्या आदेशानुसार त्यांच्या सेवाकाळात ६ महिन्यांनी वाढ करण्यात आली होती.
लष्करी रुग्णालयात २७ जून २००८ साली न्यूमोनियाच्या उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला.