कार्तिक पुजारी
राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपला आहे. त्यांच्यानंतर मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
सेवाज्येष्ठतेनुसार, सुजाता सौनिक यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.
सुजाता सौनिक या सध्या गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत.
त्या १९८७ च्या तुकडीच्या आयएएस अधिकारी आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार त्यांचाच क्रमांक पहिला लागतो.
त्या निवृत्त आयएएस अधिकारी आणि मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत.
सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगडमध्ये झाले आहे. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात मास्टर्स केले आहे.
गेल्या तीन दशकांपासून त्या प्रशासकीय सेवेत आहेत.