कोरफडीच्या जास्त वापराने फायद्याऐवजी होतं नुकसान...

Aishwarya Musale

कोरफड

कोरफड आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्याचा केवळ त्वचेसाठीच नव्हे तर आरोग्यासाठी वापर केला जातो.

यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

आरोग्य

आपल्याला त्याचे अनेक फायदे माहित आहेत, परंतु त्याचा अतिवापर केल्याने केवळ आपले आरोग्यच नाही तर आपली त्वचा देखील खराब होऊ शकते.

पोटाच्या समस्या

कोरफडीच्या पानांमध्ये लेटेक्स असते, त्याचे अतिसेवन केल्यास पोटात त्रास होऊ शकतो. काही वेळा पोटात जळजळ, वेदना होण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोरफडीच्या गराचे सेवन करू नये.

डिहायड्रेशन

उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या देखील जीवघेणी ठरू शकते. त्यामुळेच या ऋतूत अधिकाधिक पाणी आणि ज्यूस पिण्याचा आणि रसदार फळे खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या ऋतूत कोरफडीचे सेवन हानिकारक असते. .

त्वचेचे होते नुकसान

चेहऱ्यावर खूप डाग व पिंपल्स असतील तर चुकूनही कोरफडीचा गर जास्त लावू नये. यामुळे चेहऱ्यावर खाज आणि ॲलर्जी होऊ शकते.

तेलकट त्वचा

काही लोकांची त्वचा तेलकट असते. अशा त्वचेला एलोवेरा जेल सूट होत नाही.

अशा स्थितीत हे जेल लावल्याने खाज येणे आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच कोरफडीच्या गराचा वापर करा.

रेड वाईनमुळे खरंच उजळतो चेहरा? जाणून घ्या सत्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा