सकाळ डिजिटल टीम
भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसनचा आज ( ११ नोव्हेंबर) २९ वा वाढदिवस आहे.
संजू आणि त्याची पत्नी चारूलताच्या प्रेमकहाणी बद्दल आज जाणून घेऊयात.
संजू आणि चारूलथा एकाच शाळेत व एकाच कॉलेजमध्ये शिकले.
दोघांनीही तिरूअनंतापुरम या मार इव्हॅनिओस महाविद्यालयातून बॅचलर ऑफ आर्टची पदवी पुर्ण केली.
पदवी शिक्षणानंतर लॉयल कॉलेज, चेन्नईमधून चारूलथाने ह्यूमॅन रिसोर्सेस मॅनेजमेंटमधून उच्चशिक्षण पुर्ण केले.
संजूने चारूथाशी फेसबुकद्वारे मैत्री केली. पण त्याला मैत्री करण्यासाठी खुप वाट पाहावी लागली.
संजूने २२ ऑगस्ट २०१३ रोजी चारूलथाला फेसबुकवर रात्री ११ वाजता 'Hi'असा मेसेज केला. पण, तीचा रिप्लाय आला नाही.
पुढे त्यांची ओळख झाली आणि संजू व चारूलता लग्नाआधी ५ वर्ष नात्यात होते.
२२ डिसेंबर २०१८ रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले.
त्यांचे लग्न कोवलम केरळ येथे झाले. तर, लग्नाला कुटुंबीय व मित्रपरिवार उपस्थित होता.
चारूलथा एक व्यवसायिक आहे. तर, तिचे इन्स्टाग्रामवर १.१९ लाख फॉलोवर्स आहेत.