रोहित कणसे
नियमीत पायी चालण्याचे तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, पण तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर चालण्याइतका चांगला व्यायम असू शकत नाही.
आज आपण चालण्याच्या काही खास पद्धती जाणून घेणार आहोत, ज्या वापरून तुमी वजन कमी करू शकता.
जर वजन खूप जास्त असेल तर हळूहळू चालण्याएवजी वेगाने चालावे. ओव्हरवेटचा त्रास असेल तर वेगाने चालण्याचे खूप फायदे आहेत. असे नियमीत केल्याने फिटनेस सुधारतो.
खूप वेगाने आणि नॉर्मल चालण्याच्या मधल्या गतीला ब्रिस्क वॉकिंग असे म्हणतात. रोज असे चालण्याने स्टॅमिना वाढतो आणि वजन वेगाने कमी होते. वजन खूप वाढलेल्या लोकांसाठी ब्रिस्क वॉकिंग एक चांगला व्यायम ठरू शकतो.
वजन घेऊन चालल्याने जास्त कॅलरी बर्न होतात, मसल्स टोन देखील होतात. यासोबतच हाडांचे सांधे देखील मजबूत होतात. पण जर कंबर, खांदे, पाय येथे दुखत असेल तर हा वॉक घेणे टाळावे.
8 चा आकार तयार करत चाला, ३० मिनीटांपर्यंत एसे रोज चालल्याने वजन नियंत्रणात राहते, तसेच माइंड देखील शार्प राहते आणि फिटनेसमध्ये देखील मदत होते.
काही मिनीटं वेगाने चालून नंतर आपली स्पीड कमी करणे याला इंटरव्हल वॉकिंग असे म्हणतात, याचा देखील वजन कमी करण्यात खूप फायदा होतो. तसेच यामुळे हाडे देखील मजबूत होतात.
वॉक करतेवेळी प्रत्येक पावलासोबत लंज पोजिशनमध्ये जात करण्यात येणाऱ्या या वॉकिंगच्या पद्धतीला लंजेस वॉकिंग असे म्हणतात. यामध्ये चालताना एक पाय पुढे ठेवून ९० डिग्रीपर्यंत वाकावे लागते आणि नंतर मागील पाय गुढघ्यापर्यंत खाली घेऊन जायचा असतो.
पुढे चेहरा करून मागच्या बाजूला चालल्याने देखील मसल्स टोन होतात आणि वजन नियंत्रणात राहण्यात मदत होते. ही पद्धत योग्य जागा पाहून वापरावी.
निक्कीला कसा पार्टनर हवाय? स्वत:च केला खुलासा