'बियर बायसेप्स'प्रमाणे यूट्यूब चॅनल हॅक झालंय? असं करा रिकव्हर

रोहित कणसे

नुकतेच प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया उर्फ बीयर बायसेप्सचे दोन मुख्य चॅनल कोणीतरी हॅक केले आणि नंतर डिलीट देखील केले आहेत.

Google AI tool for YouTube recovery

एवढ्या मोठ्या यूट्यूबर सोबत असा प्रकार घडल्याने याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Google AI tool for YouTube recovery

सायबर गुन्हेगार अनेकदा लोकप्रीय यूट्यूब चॅनल्सना लक्ष्य करतात आणि ते हॅक करतात, गेल्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाचे यु्ट्यूब चॅनल देखील हॅक करण्यात आले होते.

हा धोका लक्षात घेऊन टेक कंपनी गुगले एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल आणले आहे ज्याच्या मदतीने क्रिएटर्स आपले हॅक झालेले अकाउंट रिकव्हर करू शकतात.

Google AI tool for YouTube recovery

जर तुमचे यूट्यूब चॅनल हॅक झाले तर तुम्ही यूट्यूब हेल्प सेंटरच्या मदतीने एआय टूलपर्यंत पोहचू शकता, हे टूल उघडल्यानंतर तुम्ही एक प्रोसिजर फॉलो करून अकाउंट रिकव्हर करू शकता.

Google AI tool for YouTube recovery

या टूलच्या मदतीने तुमचे गुगल लॉगिन सुरक्षित केले जाते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या खात्यावर नियंत्रण मिळवता येते. हे टूल चॅनेलमध्ये केलेले कोणतेही बदल दुरुस्त करण्यात मदत करते.

Google AI tool for YouTube recovery

गुगलचे हे नवीन AI टूल सध्या फक्त काही यूट्यूबर क्रिएटर्ससाठी उपलब्ध आहे.

Google AI tool for YouTube recovery

पण तुम्हाला हे AI टूल वापरता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून हे टूल मिळवू शकता.

Google AI tool for YouTube recovery

हे टूल सध्या फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे, परंतु कंपनी येत्या काही आठवड्यांत आपल्या सर्व यूट्यूब क्रिएटर्ससाठी हे टूल इतर अनेक भाषांमध्ये उपलब्ध करून देऊ शकते.

Google AI tool for YouTube recovery

'गर्लफ्रेंडमुळे Chess साठी...', डी गुकेश काय म्हणाला?

D Gukesh | Sakal
येथे क्लिक करा