Anuradha Vipat
‘मदर ऑफ कोरियोग्राफी’ हा किताब मिळवणारी बॉलिवूड डान्सर म्हणजे सरोज खान.
सरोज खान यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सरोज यांनी संपूर्ण करिअरमध्ये तब्बल २०००हून अधिक गाण्यांसाठी कोरिओग्राफर म्हणून काम केले होते.
आज जरी सरोज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांची कला आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.
सरोज खान यांना अगदी लहान असताना म्हणजे वयाच्या १३व्या वर्षी लग्न करावे लागले होते.
सरोज खान यांनी खासगी आयुष्यात केलेल्या संघर्षानंतर त्यांना करिअरमध्ये देखील सुरुवातीला संघर्ष करावा लागला होता.
३ जुलै २०२० रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.