मनमोकळेपणाने हसणे तुम्हाला 'या' आजारांपासून मुक्त ठेवू शकते!

Aishwarya Musale

आरोग्य

मनमोकळेपणाने हसल्याने घरातील वातावरण तर सुधारतेच पण ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. 

हसणे

हसणे हे सर्वोत्तम औषध मानले जाते. जीवनात तुम्ही जितके जास्त हसाल तितके तुमचे हृदय अधिक तंदुरुस्त आणि निरोगी असेल.

मनमोकळेपणाने हसल्याने आरोग्याच्या मोठ्या समस्या क्षणार्धात दूर होतात.

हसण्याने हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो आणि हृदय निरोगी राहते. मोकळेपणाने हसल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाचे कार्य चांगले होते.

रक्तदाब कमी करण्यास मदत

नियमितपणे जे लोक खूप हसतात, त्यांचे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहते.

रक्तवाहिन्यांचे कार्य हसण्यामुळे सुधारते आणि शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. ज्याद्वारे हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाशी संबंधित आजार टाळता येतात.

मूडमध्ये बदल

शरीरात हसण्याच्या प्रक्रियेदरम्यान एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे संपूर्ण शरीर आनंददायी भावना आणि सकारात्मकतेने भरते. हा हार्मोन मूड फ्रेश करण्यास मदत करतो.

नैराश्यापासून मुक्ती

शरीर हसण्यामुळे अधिक मेलाटोनिन तयार करते, जे मेंदूद्वारे सोडले जाणारे हार्मोन आहे. माणसाला यामुळे चांगली झोप लागते. एवढेच नाही तर नैराश्याने ग्रासलेल्या लोकांसाठी हा रामबाण उपाय आहे.

हाता-पायांमध्ये येणाऱ्या मुंग्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा