Red Wine: रेड वाईनचे आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या,

सकाळ डिजिटल टीम

रेड वाईनमध्ये आर्यन, मॅग्नेशिअम, व्हिटॅमीन बी 6 आणि व्हिटॅमीन सीची भरपूर प्रमाणात आढळतं. यामध्ये अनेक अॅक्टीव्ह अँटीऑक्सीडंट पण असतात. जे तुमची प्रतिकारकशक्ती वाढवतात.

अँटीऑक्सीडंट असल्यामुळे रेड वाईन तणाव कमी करते आणि फ्री रॅडीकलपासूनही रक्षण करते. यामुळे तुमची त्वचा टवटवीत दिसते.  

रेड वाईनही काळ्या द्राक्षांपासून बनवली जाते. जी चांगलं कॉलेस्ट्रॉल वाढण्यास मदत करते. ज्यामुले तुमचं हृदय राहत निरोगी आणि वजनही संतुलित राहतं.

रेड वाईनचं सेवन हे पचनशक्तीही मजबूत करतं. मर्यादित प्रमाणात रेड वाईनचं सेवन केल्यास पोटातील बॅक्टेरिया नाश पावतात आणि पोटांचा अल्सरही कमी होतो.

रेड वाईन ब्लड क्लॉटींग म्हणजेच रक्ताच्या गुठी होण्याच्या समस्येवरही गुणकारी आहे. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि पल्मनरी एम्बोलिज्मचा धोकाही कमी होतो.

नुकत्याच एका शोधात आढळलं आहे की, रेड वाईनच्या सेवनाने स्मरणशक्ती बाबतच्या समस्याचंही निवारण होतं.

डायबिटीस झालेल्या लोकांसाठी रेड वाईन खूपच फायदेशीर असतं. कारण यामध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत होते.  

रेड वाईनचं सेवन हे सौंदर्यासाठीही उपयुक्त मानलं जातं. काही महिलांमध्ये वाढत्या वयासोबत त्वचेची सुंदरता कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत रेड वाईनचा वापर हा फेसपॅक म्हणून केल्यास उपयुक्त ठरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.