सकाळ डिजिटल टीम
ब्लूटूथचे नाव कोणत्याही तंत्रज्ञानाशी संबंधित नसून एका राजाच्या नावावर आहे.
ब्लूटूथचे नाव मध्ययुगीन स्कॅन्डिनेव्हियन राजाच्या नावावर आहे.
त्या राजाचे पूर्ण नाव हॅराल्ड ब्लूटूथ गोर्मसन (Harald Bluetooth Gormsson) असे होते.
डेन्मार्क आणि नॉर्वेचे एकत्रीकरण आणि दुसरे म्हणजे त्याच्या मृत दात ज्याचा रंग गडद निळा/राखाडी होता. यानंतर या राजाला ब्लूटूथ हे टोपणनाव मिळाले.
राज्याच्या नावावरच या तंत्रज्ञानाचे नाव ठेवण्यात आले होते.
ब्लूटूथचे मालक जाप हार्टसेन हे एरिक्सन कंपनीत रेडिओ सिस्टम (Radio System ) म्हणून काम करायचे.
तसेच, एरिक्सनबरोबरच नोकिया, इंटेलसारख्या कंपन्याही त्यावर काम करत होत्या.
अशा अनेक कंपन्यांना मिळून एक गट तयार करण्यात आला होता, ज्याला SIG (Special Interest Group) असे नाव देण्यात आले होते.
ब्लूटूथ इलेक्ट्रॉनिक उपकरणांना जोडण्याचे काम करते, त्याच प्रकारे किंग हेराल्ड ब्लूटूथ याने राज्यांना जोडले होते.
यामुळे ब्लूटूथ तयार करणाऱ्या टीमचे सदस्य जिम कार्डेक यांनी त्या तंत्रज्ञानासाठी ब्लूटूथचे नाव सुचवले. जे सर्वांना आवडले. त्यानंतर त्या तंत्रज्ञानाचे नाव ब्लूटूथ असे ठेवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.