पार्टनरला 'लव्ह बाईट' देण्यापूर्वी जाणून घ्या 'या' महत्वाच्या गोष्टी

सकाळ ऑनलाईन

लिव्हिंग पार्टनरसोबत इंटिमेट होताना लव्ह बाईट देणं ही खूपच नॉर्मल गोष्ट आहे.

Love Bite

पण जर याची काळजी घेतली नाही तर त्याचा तुमच्या पार्टनरच्या आरोग्यवर विपरित परिणाम होऊ शकतो.

Love Bite

कारण बऱ्याचदा लव्ह बाईट करताना ते इतक्या आवेशात केलं जातं की, त्याची खूण दिसून येते.

Love Bite

इतकंच नव्हे बऱ्याचदा यामुळं जखम होऊ शकते त्वचेतून रक्तस्राव होऊ शकतो. त्वचा काळी निळी पडू शकते. याचे साईट इफेक्ट आणि इतर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

Love Bite

या प्रणय क्रीडेदरम्यान स्ट्रोकचा त्रास होण्याची भीती असते. अनेकदा हा प्रकार गंभीर स्वरुप धारण करु शकतो.

Love Bite

कारण इंटिमसीवेळी स्वतःला भान हरपल्यानं लव्ह बाईट देताना एखादी थोडीशी नस दाबली जाऊ शकते. त्यामुळं शरिराचा भाग पॅरलाईज होण्याचाही धोका असू शकतो. याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत.

Love Bite

सन २०११ मध्ये न्यूझिलंडच्या एका ४४ वर्षीय महिलेचा डावा हात लव्ह बाईटमुळं पॅरलाईज झाला होता.

Love Bite

त्यामुळं कायम हे लक्षात ठेवलं पाहिजे की लव्ह बाईट दरम्यान पार्टनरला कुठलाही त्रास होता कामा नये तसंच लाजीरवाण्या प्रसंगाला समोर जावं लागता कामा नये.

Love Bite