पावसात गाडीने प्रवास करताय? कार चालवताना या गोष्टी ठेवा लक्षात

Aishwarya Musale

पावसात

सध्या पावसामुळे सर्वत्र हिरवंगार आणि आल्हाददायक वातावरण आहे. आता कुठे वाढत्या तापमानापासून दिलासा मिळाला आहे.

car | sakal

कार

तुम्हीही पावसाळ्यात कारमधून बाहेर गेला असाल किंवा कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

car | sakal

खिडक्या बंद ठेवा

पाऊस पडत असेल तर गाडीच्या खिडक्या बंद कराव्यात. पावसाच्या पाण्यामुळे विंडस्क्रीनवर धुकं पडत आणि बाहेरचं दृश्य स्पष्टपणे दिसत नाही.

car | sakal

हेडलाईटचा वापर करा

अनेकदा मुसळधार पावसात गाडी चालवताना आपल्याला लांबच्या गोष्टी दिसत नाहीत, अशा वेळी हेडलाईट्सचा वापर करावा. हेडलाईट्समुळे तुम्हाला रस्त्यावरचं स्पष्ट दिसण्यास मदत होईल.

car | sakal

योग्य बाजूने गाडी चालवा

अनेकदा आपण घाईगडबडीत चुकीच्या बाजूने म्हणजेच राँग वेने गाडी चालवतो. ही चूक केल्यास मुसळधार पावसामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत आणि अपघात होण्याची शक्यता वाढते.

car | sakal

वेगावर नियंत्रण ठेवा

बर्‍याचदा मोसमाचा आनंद घेण्यासाठी आपण अतिशय वेगाने गाडी चालवतो, यामुळे वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच नेहमी वेगावर नियंत्रण ठेवा.

car | sakal

पाणी साचलेल्या सामसूम रस्त्यावर जाणं टाळा

पावसाळ्यात गाडी चालवताना घाई करणं किंवा शॉर्टकट घेणं टाळा.

car | sakal

शार्टकट

शार्टकटच्या नादात पाणी साचलेल्या सामसूम किंवा अज्ञात रस्त्यावर जाणं टाळा. योग्य मार्गानेच प्रवास करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

car | sakal