रोहित कणसे
प्रोटीन आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे, रोज प्रोटीन रीच पदार्थांचे सेवन केल्याने शरीर मजबूत होते.
आज आपण प्रोटीनचे प्रमाण भरपूर असलेल्या भाजा कोणत्या आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत.
पालक या भाजीत खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते, तज्ज्ञांच्या मते २५ ग्रॅम कच्च्या पालक भाजीत ०.७ ग्रॅम प्रोटीन असते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते ब्रोकलीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्रोटीन आढळते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
फुलगोभी हा देखील प्रोटीनचा चांगला सोर्स आहे, १०७ ग्रॅम फुलगोभीत २ ग्रॅम प्रोटीन असते.
हिरवे वाटाणे हे देखील प्रोटीनने भरलेले असतात यामध्ये फायबर देखील आढळते, दररोज वाटाणे खाल्ल्याचे अनेक फायदे सांगितले जातात.
मशरूममध्ये देखील प्रोटीन आढळते, तसेच यामध्ये व्हिटॅमीन-डी देखील असते, मशरूमचे सेवन केल्याने मसल्स ग्रोथ वाढते आणि हाडे देखील मजबूत होतात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते ॲव्होकॅडोमध्ये देखील मुबलक प्रोटीन असते, याचे दररोज सेवन केल्याने शरीर मजबूत होते आणि आजार होत नाहीत.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांची मतद घ्या.
पावसाळ्यात केस का गळतात? यापासून बचाव कसा कराल?