रोहित कणसे
आपले डोळे म्हणजे व्हिडिओ कॅमेराच आहेत; आणि यंत्र आलं म्हणजे तंत्र आणि बिघाड आलाच. काही गोष्टी लक्षात घेतल्या तर आपण डोळे चांगले ठेवू शकतो.
दररोज संगणकावर काम करताना मॉनिटर आपल्या डोळ्यांच्या समोर पाहिजे.
तुम्हाला जर नंबरचा चष्मा असेल तर तुम्ही दर वर्षी डोळे तपासून घ्यावेत.
संगणकावर काम करताना नेहमी चष्म्याची काच व मॉनिटरची काच साफ ठेवावी.
खूप काळ एकाच जागी बसून संगणकावर काम करू नये दर एक तासाने जागेवरून उठून बाल्कनीमध्ये जाऊन पाच मिनिटे लांबवर बघावे.
संगणाकावर सलग काम करावे लागत असल्यास दिवसातून निदान चार -पाच वेळा चेहरा व डोळे गार पाण्याने स्वच्छ धुवावेत.
डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उन्हात वावरताना काळा चष्मा वापरावा.
संगणकावर खूप वेळ काम करत असाल तर निरोगी डोळ्यांसाठी रात्री झोपताना डोळ्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी.
आपल्या आहाराच्या सवयी तसेच ध्यान, प्राणायाम व काही ठराविक योगासनेदेखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत.
डोळ्यांचे काही व्यायाम प्रकारदेखील आहेत, त्यामध्ये मेणबत्ती पेटवून ती डावीकडे, उजवीकडे न्यावी व मान किंवा डोके न हलविता त्या मेणबत्तीकडे बघावे, याचाही तुम्हाला फायदा होईल.
म्हणून अंकिता वालावलकरने पाहिले नाहीत बिग बॉसचे एपिसोड