Aishwarya Musale
त्वचा चमकदार होण्यासाठी बऱ्याच वेळा लोक लिंबाच्या रसाचा त्वचेसाठी वापर करतात.
हा असा घटक आहे ज्यामध्ये त्वचेसाठी अत्यंत महत्वाचे असलेले व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते.
पण लिंबाचा रस थेट त्वचेवर लावल्याने बरंच नुकसान होऊ शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? त्यामुळे लिंबाचा रस त्वचेवर लावणे योग्य की अयोग्य.
याबाबल लोकांच्या मनात कन्फ्युजन असते. लिंबू चेहऱ्यावर लावणे कितपत योग्य आहे आणि त्याचे तोटे काय आहेत हे जाणून घेऊया.
एका रिपोर्टनुसार लिंबाचा रस थेट त्वचेवर लावला तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
त्यामध्ये ब्लीचिंग इफेक्ट्स आणि व्हिटॅमिन सी असले तरी ते थेट त्वचेवर लावणे खूप भारी पडू शकते.
लिंबू थेट त्वचेवर लावल्याने लालसरपणा येणे, पुरळ येणे किंवा ॲलर्जी होऊ शकते.
तसेच लिंबामुळे सनबर्नचा त्रास आणखी वाढू शकतो. कारण त्याच्यातील ब्लीचिंग इफेक्टमुळे त्वचा जळू शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.