रोहित कणसे
सध्या डेटिंग ही एक सामान्य गोष्ट झाली आहे, अनेक लोक डेटिंगसाठी वेगवेगळे अॅप्स देखील वापरतात.
डेटिंगच्या काळात सिच्युएशनशिप या शब्दाची देखील खूप चर्चा होते आहे, याला डेटिंगचा एक नवीन प्रकार म्हटले जाऊ शकते.
सिच्युएशनशिप रिलेशनशिप आणि सिच्युएशन दोन शब्द मिळून बनला आहे, सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास कुठल्याही नात्यात नसताना देखील नात्यात असणे.
दोघं एकमेकांना डेट करत असतील मात्र त्यांच्या नात्याला नाव देऊ शकत नसतील तर त्याला सिच्युएशनशिप असे म्हटले जाऊ शकते.
यामध्ये दोघं सोबत असतात पण नात्याला मैत्रीपेक्षा जास्त पण रिलेशनशिपपेक्षा कमी मानतात.
दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, दोन लोक कोणत्याही कमिटमेंटशिवाय सोबत राहत असतील आणि नाते टिकवण्यासाठी कोणतेही प्रेशर राहात नाही.
सिच्युएशनशिपमध्ये लोक प्रेमापेक्षा आपल्या गरजा(फिजीकल, मेंटल किंवा फायनाशियल) पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात.
यामध्ये कुठलीही जबाबदारी नसते त्यामुळे कुठल्याही प्रश्न-उत्तरांशिवाय तुम्ही वेगळे होऊ शकता, त्यामुळे सिच्युएशनशिपला चांगली प्रसद्धी मिळत आहे.
याचे काही तोटे देखील आहेत, जर दोघांमध्ये एखादा सीरियस होऊ लागला किंवा कमिटमेंटची मागणी करू लागला तर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.