Chinmay Jagtap
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर रायगडावरील सिंहासनाचं काय झालं? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
खरंतर याविषयी कोणताही ठोस पुरावा नाही. काही आख्यायिका मात्र ऐकू येतात.
रायगडावर सोहळ्यादरम्यान आणलं गेलेलं सिंहासन १४४ किलोचं होतं.
सोन्यासह काही मौल्यवान धातूंनी घडवलेल्या सिंहासनाला हिरेमाणकांनी मढवलं होतं.
1818 साली इंग्रजांनी रायगडावर तोफांचा हल्ला केला. तो इतका भीषण होता की, किल्ला अनेक दिवस जळत होता.
इंग्रजांनी किल्ला ताब्यात घेऊन लुट केली. त्यात सिंहासनही हडप केल्याचं म्हटलं जातं.
पण इतकं जड सिंहासन किल्ल्यावरून उतरवणार कसं? म्हणून त्यांनी सिंहासनाचे तुकडे केले किंवा ते वितळवलं, असं म्हणतात.