रोहित कणसे
भारतीय चलनावर महात्मा गांधी यांचा फोटो आपण सर्वांनीच पाहिला आहे, पण हा फोटो चलनावर लावण्यास सुरूवात कधीपासून झाली माहितेय?
नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो नेमका कधीपासून लावण्यात येतोय, आणि त्यांच्या आधी भारतीय नोटांवर नेमका कोणाचा फोटो होता याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
भारतात करंन्सीचा वापर खूप आधीपासून केला जातो, मात्र इंग्रजांच्या काळात भारतीय नोटांवर किंग डॉर्ज VI चा फोटो वापरला जात असे.
पण भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतात पहिल्यांदा कागदी नोटा जानेवारी १९३८ मध्ये जारी केल्या, पहिली नोट पाच रुपयांची होती.
इंग्रजांच्या जोखडातून देश जेव्हा स्वतंत्र्य झाला त्यानंतर देखील भारतीय नोटांवर किंग जॉर्जचा फोटो होता, पण स्वतंत्र्याच्या दोन वर्षांनंतर १९४९ मध्ये भारत सरकारने पहिला एक रुपया डिझाईन केला.
देशातील पहिल्या एक रुपयाच्या नोटेवर किंग जॉर्ज एवजी सारनाथच्या अशोक स्तंभावरील सिंह लावण्यात आले, पण त्या नोटेवर महात्मा गांधींचा फोटो लावण्याबाबत विचार केला गेला.
महात्मा गांधीयांचा फोटो असलेली नोट आरबीआयने १९९६ मध्ये लॉन्च केली आणि त्यानंतर अशोक स्तंभ असलेल्या नोटा बदलण्यात आल्या.
१९६९ मध्ये महात्मा गांधींचे चित्र सर्वप्रथम भारतीय चलनावर लावण्यात आले होते. त्यांच्या १००व्या जयंतीनिमित्त जारी करण्यात आले होते.
महात्मा गांधींच्या १००व्या जयंतीनिमित्त जारी करण्यात आलेल्या नोटमध्ये त्यांच्या फोटोसोबत सेवाग्राम आश्रमाचा फोटो होता.
या अपघातात दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर ऑक्सफर्ड गोल्फ हेलिपॅडपासून दीड किलोमिटरच्या अंतरावर कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
महात्मा गांधींबाबतच्या 7 रंजक गोष्टी जाणून घ्या