रोहित कणसे
उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागात उन्हाचा कडाका वाढला असून लोक पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
IMD नुसार, नैऋत्य मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता असून सध्या उष्णतेशी झगडणाऱ्या लोकांना मान्सून आपल्या शहरात कधी पोहोचणार? हा प्रश्न पडला आहे.
देशाची राजधानी दिल्लीत मान्सून पोहोचण्यासाठी आयएमडीने अद्याप वेळ सांगितलेली नसला तरी, 27 जून रोजी मान्सून दिल्लीत पोहोचेल असा अंदाज रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आला आहे.
मान्सूनचा पाऊस 10 जूनपर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता असून इंडियन एक्स्प्रेसने आयएमडीच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून तो 10 ते 11 जून रोजी मुंबईत पोहोचण्याची शक्यता असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
साधारणपणे 11 जून रोजी मान्सून मुंबईत पोहोचतो, मात्र गेल्या वर्षी चक्रीवादळामुळे 2 आठवडे उशीर झाला होता.
आयएमडीने 13-14 जून रोजी मान्सून बेंगळुरूमध्ये पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे.
टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार मान्सून १ किंवा २ जून रोजी केरळमध्ये पोहोचेल. यानंतर ते ६ ते ७ जूनला कर्नाटक किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे.
रेमल चक्रीवादळामुळे कोलकाता येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडतोय, मात्र 10 जून ते 29 जून दरम्यान मान्सून बंगालमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
लखनौ हवामान केंद्राने उत्तर प्रदेशची राजधानी लनौमध्ये 19 जून ते 21 जून दरम्यान मान्सूनच्या आगमनाची शक्यता वर्तवली आहे.
मासा फ्रेश आहे की नाही कसे ओळखाल?