सकाळ डिजिटल टीम
भारतीय दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्याचप्रमाणे आशियातील सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या १६००० धावा लवकरच पुर्ण होतील.
आशियामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळांडूंमध्ये विराट कोहली चौथ्या स्थानी आहे. यादी जाणून घ्या.
सचिन तेंडूलकरने आशियामध्ये २१७४१ धावा केल्या आहेत व तो आशियामध्ये सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे.
श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने आशियामध्ये १८४२३ धावा केल्या आहेत व तो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या महिला जयवर्धने आशियामध्ये १७३८६ धावा केल्या आहेत.
भारतीय दिग्गज खेळाडू विराट कोहलीने आशियामध्ये १५९६३ धावा पुर्ण केल्या आहेत व त्याला १६००० धावा पुर्ण करण्यासाठी अवघ्या ३७ धावांची आवश्यकता आहे. तर, तो या यादीत चौथ्या स्थानी आहे.
श्रीलंकन फलंदाज सनथ जयसुर्याने आशियामध्ये १३७५७ धावा केल्या आहेत व तो यादीत पाचव्या स्थानी आहे.
सहाव्या स्थानी असलेल्या भारतीय फलंदाज राहूल द्रविडने आशियामध्ये १३४९७ धावा केल्या आहेत.