Kolhapuri Chappal : कोल्हापुरी चप्पलसाठी मिळाला 'QR कोड'; आता 'असं' ओळखता येणार बनावट चप्पल

सकाळ डिजिटल टीम

Kolhapuri Chappal QR Code : ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झाला असून, कोल्हापुरी चपलेस (Kolhapuri Chappal) ‘क्यूआर कोड’ मिळाला आहे.

Kolhapuri Chappal

चपलेच्या आत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक छोटी चीप बसविण्यात आली आहे.

Kolhapuri Chappal

ही चप्पल मोबाईलने (Mobile) स्कॅन करताच ही कुठे बनवली, कोणत्या कारागिराने बनवली, याची माहिती उपलब्ध होणार आहे.

Kolhapuri Chappal

हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता बनावट कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्यांवर आणि या बनावट चपलांच्या विक्रीवरही चाप बसणार आहे.

Kolhapuri Chappal

बाजारात बनावट कोल्हापुरी चपलांचा सुळसुळाट वाढला आहे.

Kolhapuri Chappal

याला आळा घालण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (लिडकॉम) नवा प्रयोग राबवत कोल्हापुरी चपलांना ‘क्यू आर’ कोड दिला आहे.

Kolhapuri Chappal

ग्राहकांना अस्सल आणि चांगली कोल्हापुरी चप्पल मिळावी यासाठी ‘लिडकॉम’ने ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित नवीन चपला विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. हे तंत्रज्ञान इमरटेक इनोव्हेशन प्रा. लि. या कंपनीने बनविले आहे.

Kolhapuri Chappal

Gallstones Symptoms : पित्ताशयात खडे होऊ नयेत यासाठी काय उपाय करावे?

येथे क्लिक करा