Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेतील क्वालिफायर वनचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळवला गेला.
अहमदाबादला झालेल्या या क्वालिफायर वन सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 8 विकेट्सने विजय मिळवला.
या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने यापूर्वी 2012, 2014 आणि 2021 साली आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे.
कोलकाताने 2012 आणि 2014 साली आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे, तर 2021 मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
दरम्यान, आयपीएल 2024 मधील अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईत खेळला जाणार आहे. त्यामुळे तब्बल 12 वर्षांनंतर कोलकाता चेन्नईमध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळणार आहे.
कोलकाताने 2012 मध्ये चेन्नईत चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अंतिम सामना खेळलेला ज्यात त्यांनी 5 विकेट्सने विजय मिळवला होता. हा कोलकाताचे पहिले आयपीएल विजेतेपद होते.
त्यामुळे आता चेन्नईत दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद मिळवण्याची संधी कोलकाताला असणार आहे.