Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेच्या ६८ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
बेंगळुरूला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी या सामन्यात १८ पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवणे गरजेचे होते. त्यामुळे बंगळुरूने या विजयासह आयपीएल २०२४ प्लेऑफमधील प्रवेशही पक्का केला.
त्यामुळे आता बेंगळुरू प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला आहे.
बेंगळुरूने १४ सामन्यांमधील ७ सामन्यात विजय आणि ७ सामन्यात पराभव स्विकारत १४ गुणांसह पाँइंट्स टेबलमध्ये चौथा क्रमांक निश्चित केला आहे.
त्यामुळे आता त्यांना प्लेऑफमध्ये आधी एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे.
बंगळुरूपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने पाँइंट्सटेबलमधील पहिल्या दोन क्रमांकावरील स्थानही निश्चित केल्याने ते पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळतील.
तसेच राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केला असला तरी त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यानंतर त्यांचे पाँइंट्स टेबलमधील दुसरे किंवा तिसरे स्थान निश्चित होईल.